breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, भाजपाची बैठक सुरु

मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापना करण्यासाठी काँग्रेसबरोबर भाजपानेही कंबर कसल्याचे दिसत आहे. तब्बल २४ तासानंतर बुधवारी राज्याचा निकाल स्पष्ट झाला. ११४ जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला तर भाजपाने १०९ जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेसने सत्ता स्थापण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला आहे. तर दुसरीकडे भाजपानेही आपले प्रयत्न सुरु ठेवले आहेत. भाजपामध्ये सत्ता स्थापण्यासाठीच्या हालचालींना वेग घेतला असून शिवराजसिंह चौहान यांच्या भोपाळ येथील मुख्यमंत्री निवासस्थानी तातडीची बैठक आयोजित केली आहे. भाजपाच्या या पावित्र्यामुळे काँग्रेससमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी भाजपाला ७ तर काँग्रेसला २ जागांची आवश्यकता आहे. दरम्यान, मायावती यांच्या बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. बसपाचे दोन आमदार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. दरम्यान, भाजपानेही काही अपक्षांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह, कैलास विजयवर्गीय, विनय सहस्त्रबुद्धे आणि नरेंद्रसिंह तोमर यांची उपस्थिती आहे.  बुधवारी सकाळी २३० जागांसाठीचा निकाल स्पष्ट झाला. यामध्ये काँग्रेस, भाजपा वगळता बसपाला २, सपा १ आणि इतर ४ जागा मिळाल्या. कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे या राज्यात बसपा, सपा आमदारांना मोठे महत्व आले आहे. त्यातच एका अपक्ष आमदाराने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी याबाबत काँग्रेसच्या नेत्यांची भेटही घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

दुसरीकडे भाजपाला कोणत्या परिस्थितीत सत्ता स्थापण्यापासून रोखण्यासाठी आपण मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे बसपाच्या सुप्रिमो मायावती यांनी स्पष्ट केले आहे. आज दिवसभरातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button