breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेशात काँग्रेसला समर्थन देण्याचा मायावतींचा निर्णय, भाजपाला सत्तेपासून ठेवणार दूर

मध्य प्रदेशातील अंतिम आकडेवारी समोर आली असून मतदारांनी कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेलं नाही. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाचा १०९ जागांवर विजय झाला असून समाजवादी पक्षाचा १, बहुजन समाज पक्षाचा २ आणि अपक्ष उमेदवारांचा ४ जागांवर विजय झाला आहे. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष प्रयत्न करणार असून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबत समजावादी पक्षाने काँग्रेसला समर्थन दिलं आहे. सत्तास्थापनेसाठी ११६ ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे.

‘विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरुन छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जनता भाजपा आणि त्यांच्या धोरणांविरोधात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. इतर कोणताही भक्कम पर्याय नसल्याने जनतेने काँग्रेसला निवडलं आहे’, असं मायावती यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘काँग्रेसच्या काही धोरणांशी आम्ही असहमत आहोत, मात्र तरीही मध्य प्रदेशात आम्ही त्यांना समर्थन देण्यास तयार झालो आहोत. गरज लागल्यास राजस्थानमध्येही समर्थन देऊ’.

Embedded video

ANI

@ANI

: “To keep BJP out of power we have agreed to support Congress in Madhya Pradesh and if need be in Rajasthan, even though we don’t agree with many of their policies,”says Mayawati, BSP

228 people are talking about this

शिवराजसिंह चौहान यांना हादरा बसला असून या राज्यातील मतमोजणी जवळपास २४ तासांनी संपली. मध्य प्रदेश विधानसभेत सत्तास्थापनेसाठी ११६ ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. मात्र, एकाही पक्षाला ही मॅजिक फिगर गाठता आलेली नाही. काँग्रेस बहुमतापासून २ जागा दूर आहे. तर भाजपाला सत्तास्थापनेसाठी आणखी सात आमदारांचे पाठबळ लागेल.

मध्य प्रदेशात काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपाला धक्का दिला असून एखाद्या पालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे प्रत्येक मत महत्त्वाचे असते त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशात आला. जवळपास २४ तास मध्य प्रदेशमध्ये मतमोजणी सुरु होती. बुधवारी सकाळी मतमोजणी संपली असून २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाला १०९ जागांवर विजय मिळाला आहे. अपक्ष उमेदवार ४ जागांवर निवडून आले असून बहुजन समाज पक्षाला २ आणि समाजवादी पक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button