breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील भिडेवाडयाच्या दुरावस्थेप्रश्नी भुजबळांचा सहकुटुंब आंदोलनाचा इशारा

नाशिक । महाईन्यूज ।

सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचे नाव आपण अभिमानाने घेतो. त्यांनी जिथे शिक्षणाचे मोठे कार्य उभारले त्या भिडेवाडयाची आजची अवस्था वाईट आहे. मी आजदेखील मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्याची बैठक घ्यायला सांगितले आहे. त्या दोघांनीही लवकरच पुण्यात यासंदर्भात बैठक घेऊ असे सांगितले आहे. थोडे दिवस वाट बघू, अन्यथा कुटुंबियांसमवेत आंदोलन अटळ आहे, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले वाड्यात समता पुरस्कार सोहळा संपन्न झाला. डॉ. यशवंत मनोहर यांना समता पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, मी गेली अनेक वर्षे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या विचारांच्या प्रचारासाठी प्रयत्न करत आहे. त्याचमुळे मंत्रालयात आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. फुले यांचा विचार समाजाला दिशा देणारा होता. पण त्यांच्या बाबतीत काहीही कार्य करायचे असेल ते सहजासहजी कधीचं नाही होत आपोआप तर अजिबातच होत नाही. त्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतात. भिडेवाड्याच्या डागडुजीसाठीही मी आग्रही आहे. सरकारकडून या संदर्भात मदतीची अपेक्षा आहे, असे भुजबळ म्हणाले.

कोश्यारींना टोला
भुजबळ म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपतींचा, सावित्रीबाईसह अनेकांचा अपमान करत आहेत. आता रामदेव बाबादेखील महिलांबाबत भयंकर बोलले. त्यावेळी अमृता फडणवीस त्याच कार्यक्रमात उपस्थित होत्या. आज त्या म्हणाल्या की सभ्य भाषेत बोलायला हवे होते. म्हणजे ते असभ्य भाषेत बोलले हे त्यांच्या बोलण्यावरुन सिद्ध झाले आहे. महत्वाचे म्हणजे यांना काहीही बोलण्याचा कोणी अधिकार दिला. यांचे धारिष्ट्य होते कसे? आज छत्रपतींचे राज्य असायला हवे. मग बघा यांचे धाडस होते का?, अशा शब्दांत त्यांनी कोश्यारींना खडसावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button