पिंपरी / चिंचवड

मदिना मसजिद ट्रस्टतर्फे सांगवी पोलिसांना दिवाळी फराळाचे वाटप  

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – जगाला शांतीचा संदेश देणारे हजरत मोंहमद (स.अ.स.) पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त समाजात जातीय सलोखा कायम टिकून राहण्यासाठी मदिना मसजिद ट्रस्टच्या वतीने सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळी फराळ वाटप करून आनंद लुटण्यात आला.

हा कार्यक्रम बुधवारी (दि. २१) सांगवीत घेण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस उपायुक्त श्रीधर जाधव, वरिष्ट पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे आदी उपस्थित होते.

सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी परिसराचे स्थानिक नगरसेवक आणि विघ्नहर्तान्यासचे सदस्य यांना मदिना मसजिद पिंपळे गुरवतर्फे दिवाळी फराळ देण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून पुणे शहर पोलीस विघ्नहर्तान्यासतर्फे गणेशोत्सव कालावधीमध्ये परीक्षक म्हणून केल्याबद्दल विघ्नहर्तान्यासचे सदस्य हुसेन मुलाणी, मिना मोहीते, अनिता तुतारे यांना उपायुक्त नम्रता पाटील, सहायक उपायुक्त श्रीधर जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपञ देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी मदिना मसजिद पिंपळे गुरव ट्रस्टचे अध्यक्ष करीम सैय्यद, सेक्रेटरी हुसेन मुलाणी, खजिनदार अजिज, शेखलाल, बाबुलाल आणि मदिना मसजिदचे सर्व सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासिर खान यांनी केले. आभार निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button