breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

सहकार क्षेत्रात महाराष्ट्राची ताकद मोठी; केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

- चिंचवड येथे बहुराज्यीय सहकार संस्थांच्या वेब पोर्टलचे शहांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : सर्वसामान्यांचा उद्धार करणे हाच सहकार क्षेत्राचा उद्देश आहे. आज संपूर्ण देशात 1 हजार 555 कोऑपरेटीव्ह सोसायट्यापैकी 42 टक्के सोसायटी एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या पोर्टलचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला सर्वाधिक होणार आहे. महाराष्ट्राची ही ताकद दाखविण्यासाठी मी इथे आलो असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे त्यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री बीएल वर्मा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सहकार विभागाचे सचिव ज्ञानेश कुमार आदी या वेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की, राज्याची सहकार कार्यालये देखील संगणकीकृत केली जातील. सहकार क्षेत्र पारदर्शकतेशिवाय पुढे जाणार नाही. पारदर्शक व्यवस्था समाजाच्या 60 कोटी लोकांना जोडेल. सहकारातून समृद्धी या तत्वानुसार नरेंद्र मोदी यांनी देशभर सहकार क्षेत्राला बळकटी देण्याचे काम केले आहे. गरीब व्यक्तीच्या मनात जे उद्देश होते, ते पूर्ण करण्याचे काम मोदी सरकारने नऊ वर्षात केले आहे. गरिबांना घर, घरात शुद्ध पाणी, सिलेंडर, शौचालय, विमा, मोफत अन्न आणि वीज देण्याचे काम केले. राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचे स्वप्न गरीब नागरिक बघू लागला आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्र अधिक फायदेशीर आहे, असे मत केंद्रीय मंत्री शहा यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सहकार मंत्रालयाच्या कामात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्पष्टता आणली. काही काळी व्यक्‍तिगत फायद्यासाठी उपयोग केल्याने सहकार क्षेत्र अडचणीत आले होते. त्यामध्ये बदल करण्यात आल्याने सहकार क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. उस उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा एकूण 10 हजार कोटी रुपयांचा अन्यायकारक इन्कम टॅक्‍स माफ करण्याचे धाडस शहांनी दाखविले. 370 कलम हटविले. बलशाली भारताचे स्वप्न सहकारातूनच स्थापन होईल. त्यासाठी राज्य सरकार पुर्ण ताकदीने इगो, अहंकार सोडून केंद्राच्या पाठिशी राहिल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संपूर्ण देशाचा विचार केल्यास गावोगावी सहकार क्षेत्र वाढविण्यात केवळ महाराष्ट्राच अग्रभागी राहिला आहे. महाराष्ट्राची भूमी ही सहकाराची भूमी आहे. डिजीटल पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवली जाईल. केंद्र सरकारची सहकार क्षेत्राबाबत संवेदनशीलता आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांची जन्मभूमी आणि काही कर्मभूमीही महाराष्ट्र आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांचा त्यांना अभ्यास आहे. पुर्वी डबघाईला आलेली एखादी संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला जात होता. मात्र केंद्रीय अमित शहांनी त्यामध्ये बदल करून अशा संस्थांवर प्रशासक नेमून पुर्नर्निमीतीसाठी त्यांनी प्रयत्न केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 120 वर्षाचा सहकार क्षेत्राचा इतिहास आहे. आर्थिक, सामाजिक विकासात सहकार क्षेत्र बदल घडवून आणेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्टी ठेऊन सहकार क्षेत्रासाठी नवा विभाग निर्माण केला. उस उत्पादक शेतकऱ्यांचा आयकर माफ करण्यासाठी या पुर्वी 22 वर्षे आम्ही केंद्रात हेलपाटे मारले. मात्र हा कर माफ करण्याचे धाडस कोणत्याही सरकारने केले नाही. ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी करून दाखविल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्र सरकारमार्फत 44 रेल्वे स्टेशनचा विकास सुरू असून त्यासाठी 80 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मेट्रो, पुणे नाशिक महामार्गावर सेमी लाईन टाकण्याबाबत प्रस्ताव देण्याचे केंद्रीय मंत्री शहांनी सांगितले असून त्याबाबत ते सकारात्मक आहेत.
—————-

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button