breaking-newsमहाराष्ट्र

मटक्याची बातमी छापली म्हणून वर्दीतल्या गुन्हेगाराची पत्रकाराला धमकी

  • पोलीस नागरगोजे यांना मस्ती भोवणार
  • उदगीर तालुका मराठी पत्रकार संघाचा पाठपुरावा

उदगीर, (प्रतिनिधी) – उदगीर येथील दैनिक दंडाधिकारीचे उपसंपादक अनिल जाधव यांना सेन्टर पॉइंट बारध्ये जहिरात देण्यासाठी बोलाऊन घेऊन त्यांना जातिवाचक शिविगाळ करुण तू मटक्याची बातमी का छापली, पुन्हा अशी बातमी  लावली तर तुझे हाथ पाय कलम करेन अशी धमकी उदगीर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी नागरगोजे यांनी दिली. या घटनेचा सर्व पत्रकारांनी तिव्र निषेध केला असून सबंधितावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली आहे.

उदगीर शहर व परिसरामध्ये सध्या पोलिसांच्या आशिर्वादाने मटक्याचा धंदा तेजीत सुरू आहे. यामुळे अनेक गरीबांचे संस्सार धक्याला लागले आहेत. अशा गैरधंद्यांना चाप लावण्यासाठी दैनिक दंडाधिकारीने पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली. त्यावर मटका चालविणा-यावर कारवाई करण्याचे सोडून शहर पोलीस ठाण्याचे नागरगोजे यांनी याचा राग मनात धरून रविवारी (दि. 30 डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास भ्रमणध्वणीवरून (7620841451) दंडाधिकारीचे उपसंपादक अनिल जाधव यांना उद्योग भवन येथील बार सेंटर पॉइंटमध्ये बोलाऊन घेतले. त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. त्यावर जाधव यांनी मोबाइल शुटिंग चालू केली. नागरगोजे यांनी तू मटक्याच्या बातम्या का लावतोस. परत, जर छापली तर तुझे हाथ पाय कलम करेन, अशी धमकी दिली. उपसंपादक जाधव यांनी हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये शूट केला. बाहेर येऊन त्यांनी याबाबत उपजिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी केली आहे. परंतु, अद्याप कार्यवाही झाली नाही.

आज उदगीर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर हिरमुखे यांना निवेदन देऊन संबंधित कर्मचार्‍याचे त्वरीत निलंबन करुण अनुसूचित जाति जमाती प्रतिबंध कायदा प्रमाणे कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदन देऊन केली आहे. या निवेदनावर संघाचे प. अध्यक्ष विनायक चाकुरे, प. सचिव इरफान शेख, श्रीनिवास सोनी, सुनील हावा, अर्जुन जाधव, बिबिशन मदेवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, महेश मठपती, सुनील पाटिल, अंम्बादास अलमखाने, जावेद शेख, विश्वनाथ गायकवाड़, अॅड श्रावणकुमार माने, राजुरे ज्ञानेश्वर, राजू किनीकर, बसवेश्वर डावळे, राजू मोगले आदींच्या सह्या असून ते निवेदन मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड, पोलीस अधिक्षक लातुर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व लातुर जिल्हा मराठी पत्रकार संघास दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button