breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका अतिक्रमण निर्मुलन पथकाचा ‘हम करेसो कायदा’

पिंपळे निलखमध्ये अतिक्रमण केलेल्या ‘नेट’वर कारवाई तर पत्राशेडच्या भंगार दुकानांना संरक्षण

पिंपरी  ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथकातील अधिका-यांचा ‘हम करेसो कायदा’ उघडकीस आला आहे. पिंपळे निलख येथील  प्रभाग क्रमांक 26 मध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान उपलब्ध नसल्याने खासगी जागेवर स्पोर्ट काॅम्पेक्स नेट उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी अनेक खेळाडू सराव करीत होते. मात्र, अतिक्रमण पथकातील अधिका-यांनी अतिक्रमण केले म्हणून ते नेट पाडून टाकले. परंतू, पिंपळे निलख परिसरात पत्राशेड टाकून कित्येक भंगार दुकानानी अतिक्रमण केलंय, त्या एकाही दुकानावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथकातील अधिकारी-कर्मचारी कोणाच्या तरी इशा-यावरुन कारवाई करुन कायदा ढाब्यावर बसवून मनमानी कारभार करीत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे. 

याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्या म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये तीन दिवसापुर्वी पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत पत्राशेड, बांधकामावर कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामास माझा कोणताही पाठिंबा नाही. परंतू, अतिक्रमण निर्मुलन पथकातील अधिका-यांनी सरसकट कारवाई करणे अपेक्षित आहे.

पिंपळे निलखमध्ये महापालिकेचे खेळाचे मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे खासगी जागेवरील मैदानात विद्यार्थ्यासह खेळाडूंनी नेट उपलब्ध करुन त्याठिकाणी विविध खेळांचे सराव केले जात होते. मात्र, पालिका अतिक्रमण निर्मुलन पथकाने स्पोर्ट काॅम्पेक्स खेळाचे मैदानावरील नेट पाडण्यात आले आहे.  त्यामुळे तेथील खेळांडूनी आता कोठे सराव करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुळात त्या ठिकाणी कारवाई करताना तेथील नागरिकांना कोणतीही पुर्वसुचना व नोटीस न देता पत्राशेड पाडण्यात आले आहे.

तसेच पिंपळे निलख परिसरात अतिक्रमण निर्मुलन पथकातील अधिका-यांनी सरसकट कारवाई करायला हवी. अनेक भंगार दुकाने पत्राशेडमध्ये नव्याने थाटली जात आहेत. त्या भंगार दुकानावर कसलीही कारवाई केली जात नाही. त्या दुकानाकडे अतिक्रमण पथकातील अधिकारी दुर्लक्ष करतात.  भंगार दुकान मालक व अधिका-यांचे आर्थिक हिंतसंबंध असल्यामुळे त्या दुकानावर कारवाई करण्यात येत नाही. यापुर्वी देखील भंगार दुकाने पाडण्यात यावीत, असे पत्र दिले होते. त्याकडे आपण दुर्लक्ष केले. अतिक्रमण केलेली पत्राशेड व भंगार दुकानावर कारवाई न केल्यास आंदोलन करु, असा इसारा नगरसेवक कामठे यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button