breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: महाराष्ट्रात मुंबई-पुण्यामधली कोरोनाची स्थिती गंभीर: केंद्र सरकारचे निरीक्षण; पथक येणार पाहणीला
केंद्र सरकारने मंत्रिगटाची स्थापना केली असून सहा मंत्रिगटाचं हे पथक देशातील चार राज्यांमधील प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी जाऊन केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्या दृष्टीने ही पाहणी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये हे पथक भेट देणार आहे. लॉकडाउनच्या नियमांचं पालन होतंय की नाही? केंद्र सरकारने लॉकडाउन दरम्यान जे नियम सांगितले आहेत त्यांचं उल्लंघन होत नाही ना? उल्लंघन झाल्याच्या राज्यात किती तक्रारी आहेत या सगळ्याचा आढावा हे पथक घेणार आहे.