breaking-newsपिंपरी / चिंचवड
भोसरी रुग्णालयातील ५५ वर्षीय वॉर्डबॉयला कोरोनाची लागण
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भोसरीतील जुन्या रुग्णालयातील ५५ वर्षीय वॉर्डबॉयचे शुक्रवारी रात्री कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वॉर्डबॉयच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील पाच जणांचे नमुने तत्काळ तपासणीसाठी पाठविले आहेत. यामध्ये दोन डॉक्टर, नर्स आहेत. येथील १५ लोकांना होम क्वारंटाईन केले आहे. हा वॉर्डबॉय भोसरीतीलच रहिवाशी आहे. डॉक्टरांच्या केबीनसमोर वॉर्डबॉयची ड्युटी होती. रुग्णालयात वॉर्डबॉयची संख्या जास्त आहे. आणखीन काही संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.