breaking-newsपिंपरी / चिंचवड

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने ‘ऑनलाइन नोकरी महोत्सव’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रविवारी (दि. १४) रोजी पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरात ‘ऑनलाइन नोकरी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

मनसेतर्फे महाराष्ट्रातील बेरोजगार युवक – युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. सध्या महाराष्ट्रातील औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या परिस्थितीत युवकांनी आळस झटकून या रोजगारसंधी स्वीकारण्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची संधी नकीच मिळेल. तेव्हा उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधी प्राप्त करून घेण्यासाठी गरजू, बेरोजगार युवक-युवतींनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सचिन चिखले आणि विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी केले आहे.

इच्छुक युवकांनी [email protected] या ईमेल आयडीवर आपली नोंदणी करून बायोडाटा पाठवावा. राहुल तांबोळी ९१६८७०९९८७, डांगे ९७१६८९ २३४५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button