breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निवडणूक मैदानातून पळ काढणाऱ्या संजोग वाघेरेंच्या आडनावाताच केवळ ‘वाघ’

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून जन्मापासून सत्ता उपभोगूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना ते राहत असलेल्या पिंपरीगावचा विकास करता आलेला नाही. परंतु, भाजपने पिंपरी महापालिकेत सत्ता आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या आत पिंपरीगावातील विविध प्रकल्प आणि विकासकामे करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे वाघेरे यांचा तिळपापड होत असून ते भाजपवर असभ्य, बेछूट तसेच खालच्या पातळीवर जात आरोप करीत आहेत. संजोग वाघेरे यांच्या आडनावातच वाघ आहे. मात्र प्रत्यक्षात ते “भिगी बिल्ली” आहेत. त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला होता. पण मी जनतेच्या दारात जाऊन त्यांचा कौल घेतला. त्यामुळे पळून जाणाऱ्या संजोग वाघेरे यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये, असे सडेतोड प्रत्युत्तर महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केलेल्या टिकेला पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे जन्मापासूनच २०१७ पर्यंत सत्तेत होते. आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता उपभोगली आहे. इतकी वर्षे सत्ताधारी असलेल्या वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड शहराचे सोडाच मात्र त्यांना त्यांच्या स्वत:च्या वार्डाचा विकास करता आलेला नाही. त्यांचा केवळ आपल्या पुर्वजांच्या स्मारकाचे सुशोभिकरण करण्याचा अट्टाहास असतो. पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नुतनीकरणाचे व सुशोभिकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.
आता ज्या पक्षाचे शहराध्यक्ष आहेत, त्याच राष्ट्रवादीने २०१२ च्या महापालिका निवडणुकीत संजोग वाघेरे यांना तिकीट नाकारले होते. पक्षविरोधी काम करत अपक्ष म्हणून ते निवडून आले होते. त्यामुळे  राष्ट्रवादीचे निष्ठावान असल्याचे सांगण्याचा वाघेरे यांना अधिकार नाही. त्यांना पक्षनिष्ठा किंवा शहरवासियांच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे नाही. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून मिरवण्याचा सोस आहे. दरम्यान, संजोग वाघेरे यांनी २०१४ मध्ये  मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र त्यांची तेवढी राजकीय उंची, कार्य आणि प्रतिमा नसल्याचे त्यांना वेळीच उमगले. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. शेवटी राष्ट्रवादीला आयात उमेदवार उभा करावा लागला. पण मी कधीही निवडणुकीच्या मैदानातून पळ काढलेला नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करत भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा जास्त मते घेतली आहेत. शहराच्या राजकारणाचा अभ्यास कमी असलेल्या संजोग वाघेरे यांना हे कदाचित माहिती नसेल. त्यामुळे वाघेरे यांनी आपल्या पक्षात स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी वेळ खर्ची घालावा. भाजपला किंवा मला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये, असे पवार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button