breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत बनावट कागदपत्राद्वारे जागेची परस्पर विक्री

  • पोलीस ठाण्यात फिर्याद : गणपत लांडगे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

पिंपरी । प्रतिनिधी ।

बनावट कागदपत्राद्वारे झोन दाखला तयार करुन बेकायदेशीर ताबा मिळवून ५४.९० आर जागेची इतर लोकांना विक्री केली आहे. त्यामुळे दोघांविरुध्द भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

गणपत विठ्ठल लांडगे (रा. लक्ष्मी काॅम्पलेक्स, इंद्रायणीनगर, भोसरी), अनुपमा काटे ( रा. दगडूशेठ गणपती मंदिरामागे, जोगेश्वरी बोळ, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमानूसार कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४४८, ५०४, ५०६ आणि ३४ नूसार८ जूलै २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश किसन लांडगे ( रा. सदगुरुनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी म्हटले आहे की, भोसरी येथील सर्व्हे नं.१३६/१ ब/ १ यामधील एकूण ९७ आर सामाईक मिळकत आहे. सदरील सामाईक क्षेत्राचे वाटप झालेले आहे.त्यापैकी मी आणि माझा भाऊ सयाजी किसन लांडगे असे दोघांच्या वाट्यास ५०.६ आर क्षेत्र येत आहे. तर उर्वरित क्षेत्र मयत कै. ज्ञानेश्वर तुकाराम लांडगे याचे वारसआणि मयत कै. चंद्रकांत तुकाराम लांडगे यांचे वारस अनुपमा विजय काटे यांच्यात सामाईक क्षेत्र येत आहे. मात्र, गणपत लांडगे यांनी ज्ञानेश्वर लांडगे आणि अनुपमा काटे यांच्याकडून त्यांच्या हिश्श्याचे ३३.७३ आर. क्षेत्र येत असताना संगणमताने व जाणीवपूर्वक ६० आर मिळकत क्षेत्राचे बनावट कुलमुखत्यार पत्र तयार केले आहे. तसेच लबाडीने व जाणीवपूर्वक बनावट कुलमुखत्यार पत्र नोंदवून स्व:ताची कुलमुखत्यारधारक म्हणून नोंद केली आहे. गणपत लांडगे यांनी कै. ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हिश्याचे कुलमुखत्यार पत्रात नोंदवलेले मिळकतीचे वर्णन पूर्णपणे चुकीचे आहे.

ज्ञानेश्वर लांडगे हे मयत असल्याचे माहीत असूनही हवेली रजिस्टार कार्यालयामध्ये वेळोवेळी सर्व्हे नं.१३६/१ब/१ मिळकतीचे विक्री करताना ज्ञानेश्वर लांडगे हेजीवंत असल्याचे खोटे शपथपत्र जोडले आहे. तसेच, बनावट झोन दाखल तयार करुन वरील मिळकतीचे बनावट कुलमुखत्यारपत्राचे आधारे एकूण ५४.९० आर. क्षेत्र इतर लोकांना विकून मोठा नफा कमविला आहे.

मयत व्यक्तीचे केले खोटे शपथपत्र…

सदरील सर्व्हे नंबरमधील बनावट कागदपत्राने वडिलोपार्जित क्षेत्र ५०.६ आर या मिळकतीवर बेकायदेशीर ताबा दाखवून विक्री करुन उर्वरित क्षेत्रावर ताबा घेतलेला आहे. फिर्यादीच्या मिळकतीचे बेकायदेशीर विक्री केल्याने याबाबत गणपत लांडगे यांना फिर्यादीने विचारले असता त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे गणपत विठ्ठल लांडगे यांच्यावर जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेवून बनावट कुलमुखत्यार पत्राच्या आधारे, कै. ज्ञानेश्वर लांडगे जीवंत असल्याचे खोटे शपथपत्र वापरुन व बनावट झोन दाखला तयार करुन इतर लोकांना संबंधित मिळकतीची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला…

तसेच १३६ या गटातील सव्‍हेनंबर १३६/५ या मिळकतीचा बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी गणपत लांडगे यांच्यावर जून-२०१९ मध्येही गुन्हा दाखल झाला आहे. त्यासंबंधित फिर्याद युवराज बाळासाहेब लांडगे (रा. भोसरी) यांनी दिली आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपी गणपत लांडगे सध्या फरार असून शिवाजीनगर न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आहे.

गणपत लांडगे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी…

भोसरी पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे भोसरी, विश्रांतवाडी, वाकड, सोलापूर, कोल्हापूर आदी पोलीस ठाण्यांमध्ये अवैध जुगारअड्डा चालवणे, गौणखनिज उत्खनन, अवैध मुरूमचोरी, वाहन विक्री फसवणूक, महिलेचा विनयभंग असे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. तसेच, इंद्रायणीनगर भोसरी, प्राधिकरण सेक्टर ७ या ठिकाणी बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेवून खोल्या बांधल्या आहेत. तसेच, व्यावसायिक गाळे व वॉशिंग सेंटर अवैधपणे सुरू आहे. ट्रान्सपोर्टच्या वाहनांचे अवैधपणे भाडेआकारणी करीत आहे. प्राधिकरणाच्या जागेवर घेतलेल्या ताब्याची चौकशीही माहिती अधिकारात घेतली असून त्यावरही लवकरच कारवाई होणार आहे. सर्‍व्हे नंबर १३६। १ ब। १ या मिळकतीतील फसवणूक प्रकरणात खरेदी घेणा-यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असून, त्यासंबंधी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करवाई करण्यात येणार आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button