breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आज-यात ट्रक पुलाला धडकला, पावसाच्या पाण्यात सिलेंडर गेले वाहून

कोल्हापूर  –  कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. संतधार पावसाने रस्तेही निसरडे झाले आहेत. जिल्ह्यातल्या आजरा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ट्रक नदीवरच्या पुलाला धडकला. यात ट्रकचा भाग पुलाकडे झुकला गेला. या ट्रकमध्ये सिलेंडर होते. अपघातातमुळे ट्रकमधे सगळे सिलेंडर नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाण्याला वेग होता. त्यामुळे पाण्यात सगळीकडेच सिलेंडर दिसून लागल्याने एकच खळबळ उडाली.

हा ट्रक कोल्हापूरकडे जात असताना व्हिक्टोरिया पुलावर हा अपघात झाला. वेगात असलेला ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला. त्यामुळे सगळे सिलेंडर नदीच्या पाण्यात पडले. हे सिलेंडर रिकामे असल्याने मोठा अनर्थ टळला. सिलेंडर रिकामे असल्याने ते नदीच्या पाण्यात तरंगू लागले.

या सिलेंडरमध्ये जर गॅस असता तर मोठा अनर्थ घडला असता. अपघातामुळे अशा सिलेंडरचा स्फोट होण्याची शक्यताही असते. या घटनेची माहिती कळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. सर्व रिकामे सिलेंडर गोळा करण्याचं काम सुरू आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे सिलेंडर्स विविध ठिकाणी जाऊन अडकले आहेत. तर काही सिलेडंर्स प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत. गाडीतून खाली पडलेले सर्व सिलेंडर्स पुन्हा जमा करणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button