breaking-newsपिंपरी / चिंचवड

भोसरीतील तरूणाची बीएमडब्ल्यू अंबेनळीच्या घाटात कोसळली; चालक सुखरूप

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भोसरीतील तरूणाची बीएमडब्यू कार अंबेनळीच्या ५० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीची जीवितहानी झाली नाही. हा भीषण अपघात आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास झाला.

प्रशांत राजेंद्र सस्ते (वय २८, रा. भोसरी) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. सकाळच्या सुमारास प्रशांत सस्ते पोलादपूरहून माथेरानच्या दिशेने जात होते. यावेऴी गाडी घाटामधून जात असतानाच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट गडीमध्ये कोसळली. मात्र दरीतील घनदाट झाडीमुळे गाडी झाडाला अडकली अन् ती दरीत आणखीन खाली सरकली नाही. या गाडीमध्ये केवळ चालकच होता. झाडांच्या फांद्याच्या मदतीने चालक सुखरुप वर आला. चालक सस्ते याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर चालकाला जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button