breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जेवायला गेलेले तीन मित्र गाडीसह वाहून गेले, पुण्यातील घटना

पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|

पुण्यात बुधवारी रात्री ढगफुटीसदृष झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: हाहाकार उडाला आहे. एका रात्रीत पावसाने 17 जणांचा बळी घेतला आहे तर तब्बल 60 जनावरे दगावली आहेत. पार्टी करायला गेलेले कात्रजचे तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीसकट तिघे वाहून गेले आहेत. काळेवाडी परिसरात त्यांची वॅगनार कार आणि मोबाइलचा सापडला आहे. मात्र, तरुणांचा अद्याप शोध लागलेला नाही. सुरज वाडकर, निखील चव्हाण, गणेश शिंदे अशी या बेपत्ता तरुणांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, कात्रज परिसरात राहणारे तीन मित्र एका पार्टीसाठी पुण्यालगतच्या कोळेवाडीतील हॉटेलमध्ये गेले होते. परत येताना तिघेही त्यांच्या वॅगनार या गाडीसकट वाहून गेले. काळेवाडी परिसरात एका नाल्यातील झाडात गाडी अडकून पडलेली सापडली. शुक्रवारी काही अंतरावर एक मृतदेह पोलिसांना सापडला आहे. सुरज वाडकर असी मृतदेहाची ओळख पटली आहे. सुरज वाडकर याचा मृतदेह जांभुळवाडीच्या तलावात सापडला आहे. इतर दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button