पिंपरी / चिंचवड

कोयत्याचा धाक दाखवून तरुणाची दुचाकी आणि मोबाईल पळवला

पिंपरी l प्रतिनिधी

दुचाकीवरून जाणा-या तरुणाला अडवून त्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याची दुचाकी आणि मोबाईल फोन तीन अनोळखी व्यक्तींनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 11) मध्यरात्री सव्वा एक वाजता एमआयडीसी भोसरी येथे घडली.

परेश राजू पाटील (वय 23, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी मध्यरात्री दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून थांबवले. त्यांनतर फिर्यादी यांची 25 हजारांची दुचाकी आणि पाच हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button