breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीची उमेदवारी माजी आमदार विलास लांडे यांनाच द्या, अन्यथा…

  • मुंबईतील बैठकीत शरद पवार यांना घातले साकडे
  • शिक्षण मंडळ माजी सभापती विजय लोखंडे यांची मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी आमदार विलास लांडे यांना देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तत्कालीन शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे यांनी बैठकीत केली. पक्षाचे नेते शरद पवार यांनी भोसरीतील एका मेळाव्यात नवीन चेह-याला संधी देण्याचे घोषीत केल्यानंतर लांडे समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसते. नवीन चेहरा दिल्यास कायमचे अधापतन करून घेण्याची वेळ आपल्यावर येणार असल्याचे संकेत मिळताच लांडे समर्थकांनी पवार यांना पुन्हा साकडे घालायला सुरूवात केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक मुंबईत घेण्यात आली. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगण भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडमधून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील 70 ते 80 पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील सक्षम उमेदवाराची चाचपनी करून त्याला विधानसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्याबाबत आज बैठकीत चर्चा करण्यात आली. पिंपरी आणि चिंचवड मतदार संघाच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्यापूर्वी भोसरी मतदार संघातून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तत्कालीन शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे यांनी भोसरीची उमेदवारी माजी आमदार विलास लांडे यांनाच देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. मात्र, लांडे यांनाच उमेदवारी मिळणार, हे निश्चित माणण्याइतपत पवारांकडून स्पष्ट संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे लांडे समर्थकांच्या चेह-यावर नाराजी दिसत होती.

लांडे-साने वादाची चिन्हे

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे अभिनंदन करण्यासाठी भोसरी एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये मेळावा घेण्यात आला होता. भोसरी मतदार संघातून नवीन चेह-याला उमेदवारी देण्याचे शरद पवार यांनी यावेळी घोषीत केले होते. तथापि, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने हे भोसरीतून लढण्याची तयारी करत आहेत. पक्षाने माजी आमदार लांडे यांना बाजुला ठेवून साने यांना उमेदवारी दिल्यास लांडे-साने यांच्यात वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत. नवीन चेहरा देण्याचे घोषीत केले असताना कार्यकर्ते पुन्हा लांडे यांच्या उमेदवारीची मागणी करत असल्याने दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button