breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

माढ्यात शरद पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत

पुणे : शरद पवारांनी माढ्यात आपला उमेदवार अजूनही जाहीर केला नाहीये. यामागे पवारांचं काही राजकीय गणित आहे का? माढा मतदारसंघात शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा सुरु झालीये. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकरांच्या भूमिकेकडे शरद पवारांचं लक्ष असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान माढ्यातून गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर शरद पवार गटाकडून संजीवराजे निंबाळकरांच्या नावाचीही चाचपणी सुरु असल्याची चर्चा आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी गुरुवारी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील नियोजनाचा आढावा घेतला. तसंच मोहिते कुटुंबाच्या नाराजीवरही त्यांनी भाष्य केलंय.

काही दिवसांपूर्वी मोहिते कुटुंबातून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तुतारी हाती घेण्याचं आमचं ठरलं असल्याचं जयसिंह मोहिते पाटलांनी म्हटलं होतं. दरम्यान मोहिते कुटुंबात ही नाराजी कशामुळे आहे. हे जाणून घेऊयात.

हेही वाचा – तीन दिवस अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीस बंदी

२०१९ च्या निवडणुकीत माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर खासदार झाले. निंबाळकरांच्या विजयात मोहितेंच्या खारीचा वाटा होता. मात्र कालांतरानं निंबाळकर आणि मोहितेंचे संबंध बिघडले. स्थानिक कामांवरुन श्रेयवादाची सुप्त लढाई रंगली. मधल्या काळात धैर्यशील मोहितेंनी भाजपकडून उमेदवारीच्या आशेवर तयारी केली. मात्र भाजपनं पुन्हा रणजितसिंहा निंबाळकरांना तिकीट दिल्यामुळे मोहितेंचा विरोध आहे.

भाजप उमेदवाराला अजित पवार गटाच्या रामराजेंनीही विरोध केला आहे. मात्र, निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम असल्याचं बोललं जात असल्यानं मोहिते हाती तुतारी घेण्याच्या पावित्र्यात आहेत.

महायुतीकडून माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आलीय. २०१९ मध्ये त्यांच्यासमोर आता अजितदादा गटात असलेले संजयमामा शिंदेंचं आव्हान होतं. २०१९ माढा लोकसभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर विरूद्ध संजयमामा शिंदे आमनेसामने होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ५ लाख ८३ हजार १९१ मतं मिळाली होती. तर संजयमामा शिंदे यांना ४ लाख ९८ हजार ४४१ मतं मिळाली होती. ८४ हजार ७५० मतांनी संजय शिंदेंचा पराभव झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button