breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

अवकाळी संकट कायम! पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारांचाही पाऊस झाला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

३ डिसेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत देशात मुसळधार पाऊस पडणार आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. IMD कडून तामिळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा  –  शेतकऱ्यांच्या नावाने तब्बल ८००० कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा 

राज्यात पुढील २४ तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच ४ व ५ डिसेंबर रोजी देखील राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र यानंतर पाऊस कमी होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button