breaking-newsमुंबई

भीमा कोरेगाव दंगलीमागे फडणवीस सरकार, शरद पवारांचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | महाईन्यूज

भीमा कोरेगाव येथील 2018 मध्ये झालेल्या दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. पवारांच्या या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्रामध्ये याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी दोन पानांचे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप पवारांनी केला आहे.

“पोलिसांनीही अनेक पुरावे तोडून-मोडून सादर केले आहेत, असाही आरोप पवरांनी पोलिसांवर केला. माझे स्पष्ट मत आहे की तात्कालीन सरकारने पोलिसांसोबत मिळून षडयंत्र रचलेलं होते. तसेच हिंसा केलेल्या मुख्य आरोपींविरोधात गुन्हे दाखल न करता या प्रकरणावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला”, असंही पवारांनी पत्रात म्हटलं आहे. “फडणवीस सरकारचे मुख्य उद्देश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबणे आणि लोकशाही आंदोलन अयशस्वी करणे हे होते. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्वलोक हे समाजातील सन्मानित नागरिक आहेत”, असं पवारांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button