breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील पावसाळापूर्व अत्यावश्यक कामेच हाती घ्या – माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पावसाळ्या पूर्वीची तसेच “हीरक महोत्सवी महाराष्ट्र – नागरी स्वच्छता अभियान” यामधील फक्त अत्यावश्यक कामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, सव्वा महिन्यावर पावसाळा आला आहे. आपली सर्व यंत्रणा कोरोना साथीच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी व्यस्त आहे. तसेच राज्य शासनानेही उपस्थितीवर मर्यादा आणली आहे. कोरोना रुग्णांची संख्या पिंपरी-चिंचवडमध्येही दिवसेंदिवस वाढत आहे. आपण यासाठी यथायोग्य परिश्रम घेतात परंतु त्याच बरोबर पावसाळ्या अगोदर करावयाची अत्यावश्यक कामे करणे गरजेचे आहे. जेणेकरून कोणताही अपघात किंवा दुर्घटना होणार नाही याबाबत ही विशेष खबरदारी घेतली पाहिजे.

रस्त्यांवरचे खड्डे बुजवणे, रस्त्यांच्या आतमध्ये गेलेले चेंबर्स रोड लेव्हलला आणणे, नाला साफ सफाई करणे, वाळलेली झाडे किंवा त्यांच्या फांद्या तोडणे, अंतर्गत किंवा मेन रोडची डागडूजी करणे, रस्त्यावर पाणी साठणार नाही याची काळजी घेणे वरील सर्व कामे नागरिकांच्या हितसंबंधांसाठी आहेत. यामुळे कोणतीही दुर्घटना अपघात किंवा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होणार नाहीत म्हणून ही अत्यावश्यक कामे करणे पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे आहे. दिनांक 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा, “हिरक महोत्सवी महाराष्ट्र – नागरी स्वच्छता अभियान” साजरा होत असतो यामध्ये विविध कामे महाराष्ट्र शासनाने नगरविकास खात्याने आपणास करण्यास दिलेली असतात पण या मधील अत्यावश्यक कामे आपण करावी अशी आमची विनंती आहे.

शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, शहरात निर्माण होणान्या घनकचऱ्याचे 100 % संकलन करणे, घनकचर्याचे विलगीकरण चे प्रमाण वाढवणे, विलग कृत घनकचरा कचऱ्यावर 100 % प्रक्रिया करणे, जुन्या साठवलेल्या कच-यावर बायो माइनिंग करणे, रस्त्याची सुधारणा व सौंदर्य करीन करणे, पदपथांची सुधारणा व सौंदर्गीकरण करणे, वाहतूक बेटे व दुभाजकांचा सौंदर्य करण करणे, शहरातील उड्डाणपुलांचे सौंदर्गीकरण करणे, उद्यानांचे सौंदर्यीकरण करणे विविध जाहिरात फलक काढणे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे, शहरातील नाल्यांची साफसफाई करणे, सर्वसाधारण स्वच्छता करणे, संबंधित शहरांसाठी समान विशिष्ट पूर्ण डिझाईन तयार करणे. या कामांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होत असून यासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी स्वच्छ भारत अभियानासाठी राखून ठेवलेल्या 50 % निधीमधून या हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियानाच्या कालावधीत करण्यात येणा-या कामावर खर्च करता येतो.

परंतु सध्या आपले पिंपरी चिंचवड शहर कोरोना सारख्या साथीने ग्रासले आहे. म्हणून वरील पैकी फक्त नागरिकांच्या आरोग्याच्या तसेच कोणताही अपघात होणार नाही तसेच पर्यावरण विषयक कामे फक्त हाती घ्यावीत. जेणेकरून आपणास कोरोना विषयक कामांसाठी आपला वेळ खर्च करता येईल व आपले पिंपरी चिंचवड शहर पूर्णपणे कोरोना मुक्त शहर होईल. आपणास शहरातील सर्व मैदाने, मोठ्या प्रमाणात असलेल्या मोकळ्या जागा, भाजीपाला विक्रीसाठी नागरिकांना उपलब्ध करून द्यावीत जेणेकरून तेथे सोशल डिस्टेंसिंगचे पालन व्यवस्थितरित्या करता येईल. पिंपरी – चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागवार जास्तीजास्त कोरोना टेस्ट करून घ्याव्यात. दिनांक 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन व कामगार दिन आहे, तरी माझी शहरातील सर्व नागरिकांना व कामगारांना अवाहन आहे की, आपण घरातच थांबावे, सुरक्षित रहावे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. केंद्र सरकारने, राज्य सरकारने, स्थानिक स्वराज्यसंस्थांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी कामगारांनी काटेकोरपणे पालन करून कोरोना साथीचा लढा यशस्वीपणे पार पाडून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर कोरोना मुक्त करणे. अशाप्रकारे शहरातील सर्व नागरिकांनी महाराष्ट्र राज्य स्थापनादिन व कामगार दिन घरात थांबून, सुरक्षित राहून साजरा करावा, असे आवाहन बाबर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button