breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी महापालिकेत महिलांचे प्रशिक्षण वर्ग पुन्हा सुरु होणार

पिंपरी |महाईन्यूज| प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत महिला प्रशिक्षण कार्यक्रम सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने बंद केले होते. आता पुन्हा हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. महिला प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत 21 प्रशिक्षण वर्गांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याला महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर जून 2017 मध्ये सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादीच्या काळातील महिला प्रशिक्षण योजना बंद केली होती. त्यामध्ये बदल करून पंडीत दिनदयाल उपाध्याय महिलांसाठी ज्ञान कौशल्य कार्यक्रम सुरू केला. त्या अंतर्गंत शहरातील महिलांना सॅनिटरी नॅपकीन, गांडुळ खत तयार करणे, स्पोकन इंग्लिश, फिटनेस ट्रेनिंग, रुग्णसेविका, हाऊसकिपींग, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, सुरक्षारक्षक, पारंपारिक दागिने तयार करणे, आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासारख्या एकूण 14 महिला कोर्सेसचा त्यात समावेश होता. साधारण 90, 45, 60 दिवसांचे हे वेगवेगळे कोर्सेस चालविले जात होते.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे प्रशिक्षण वर्ग पुन्हा नव्याने सुरू करण्यात येणार आहे. त्याची व्याप्ती वाढवून त्यामध्ये 14 ऐवजी 21 अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये स्पोकन इंग्लिश, ड्रेस डिझायनिंग, पेपरपासुन साहित्य व पिशवी निर्मिती, पारंपारिक दागिने तयार कऱणे, फायबर ग्लास प्रशिक्षण, स्नॅक्‍स प्रिपरेशन, बाल संगोपन प्रशिक्षण, लेदरपासून वस्तू तयार करणे, ब्युटी केअर, किरकोळ विक्रेता, विमा सल्लागार प्रशिक्षण, विविध प्रकारचे मसाले तयार करणे, देण्यात येणार आहे.

यासोबतच अकाउंटीग, हाऊसकिपींग, रिसेप्शनिस्ट, फोटोग्राफी, रिअल इस्टेट प्रतिनिधी, ट्रॅव्हल व टुरिझम, ऑनलाईन स्वर्हिसेस या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांचा कालावधी तीन ते एक महिना असा आहे. यामध्ये दररोज दोन तास याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिलांना स्वंयरोजगाराचे साधन निर्माण व्हावे यासाठी ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button