breaking-newsपुणे

भीमथडी जत्रेत खाद्यभ्रमंती, खरेदी आणि लोककलांची मेजवानी

झुणका भाकरी, उकडीचे मोदक, पुरणाचे मांडे, तिखटजाळ सामिष खाद्यपदार्थ, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले तांदूळ, कडधान्य, गहू, रसायन विरहीत गूळ, मध, काकवी, लाकडी घाण्यावर काढलेल्या तेलांचे प्रकार, पापड, लोणची अशा एकापेक्षा एक सरस खाद्यपदार्थाची मेजवानी पुढील चार दिवस पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच खरेदी आणि लोककला प्रकारांचा आस्वाद या जत्रेत घेता येणार आहे.

बारामती अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भीमथडी जत्रेला शनिवारपासून सुरुवात झाली. २६ डिसेंबपर्यंत चालणाऱ्या या आनंदसोहळ्यात खाद्यभ्रमंती, खरेदी आणि लोककला असा तिहेरी अनुभव घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. बारामती अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते शनिवारी या जत्रेचे उद्घाटन झाले. हातमागावरील कापड, त्यापासून बनवलेले कपडय़ांचे विविध प्रकार आणि पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचे स्टॉल्स असलेले भीमथडी सिलेक्ट हे यंदाच्या भीमथडी जत्रेचे वैशिष्टय़ ठरणार आहे. रिसायकल, रियूज अ‍ॅण्ड सस्टेन या संकल्पनेवर यंदाची भीमथडी जत्रा भरवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्यपदार्थाबरोबरच हस्तकलेच्या वस्तू, हातमागावरचे कापड यांची खरेदी भीमथडी जत्रेत करता येणार आहे. जत्रेच्या ठिकाणी शाहिरी, भारुडे, लोकनृत्य सादर करणारे लोककलावंत नव्या पिढीला पाहता येईल. दगडी जाते, पाटावरवंटा, चाकावर कुंभाराकडून घडवली जाणारी मातीची भांडी, हातमागावर विणली जाणारी घोंगडी या गोष्टीसुद्धा भीमथडी जत्रेत प्रत्यक्ष अनुभवता येणार आहेत. लहान मुलांना बैलगाडीतून फिरण्याची गंमत देखिल या जत्रेत अनुभवता येणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button