जेएनयु विद्यार्थी संघटनेला हायकोर्टाचा दणका
नवी दिल्ली – जेएनयु विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपासून शंभर मीटरच्या आत मध्ये कोणतीही निदर्शने आयोजित करू नये असा आदेश न्यायालयाने देऊनही तेथे हा आदेश झुगारून निदर्शने केल्याच्या कारणावरून दिल्ली उच्च न्यायालयाने तेथील विद्यार्थी संघटनेला नोटीस जारी केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने 9 ऑगस्ट 2017 ला हा आदेश दिला होता. पण या निकालाच्या आदेशाचा वेगळाच अन्वयार्थ लाऊन त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न या विद्यार्थीं संघटनांनी केला असून त्यांनी जाणिवपुर्वक या आदेशाचा भंग केला आहे असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या संघटनेला कोर्टाच्या आदेशाची बेअदबी केल्याच्या कारणावरून नोटीस बजावत निदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला.
जेएनयु विद्यापीठात वर्गात बसण्याविषयीचा सक्ती आदेश काढण्यात आला आहे त्याच्या विरोधात तेथील विद्यार्थी सध्या आंदोलन करीत आहेत.