breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारत विरुद्ध चीन: लडाखच्या सीमेवर दिसलं चिनी हेलिकॉप्टर अन् क्षणार्धात…

काही दिवसांपूर्वीच सिक्कीममधील चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळ चीन आणि भारताचे सैनिक आमने सामने आले होते. त्यांच्यात झालेल्या झटापटीनंकर दोन्ही बाजूचे सैनिक किरकोळ जखमी झाल्याचा प्रकार घडला होता. स्थानिक यंत्रणांच्या मध्यस्थीनंतर तो वाद शांत झाला होता. अशातच लडाखजवळील नियंत्रण रेषेजवळ चीनची हेलिकॉप्टर घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं होतं.

चीनची हेलिकॉप्टर लडाखजवळील नियंत्रण रेषेवर घिरट्या घालत असल्याचं दिसल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी त्वरित उड्डाण घेत गस्त घालण्यास सुरूवात केली. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. ज्यावेळी सिक्कीममधील सीमा रेषेवर चीन आणि भारताचे जवान समोरासमोर आले होते त्याच वेळी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

चीनची हेलिकॉप्ट नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ घिरट्या घालत होती. याची माहिती भारतीय हवाई दलाला मिळताच हवाई दलाच्या लढाऊ विमानांनीही या क्षेत्रात गस्त घालण्यास सुरूवात केल्याची माहिती, सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसंच ही हे हेलिकॉप्टर्स नियंत्रण रेषेच्या नजीक असली तरी त्यांनी नियंत्रण रेषा पार केली नाही, असं सरकारी सूत्रांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एएनआयशी बोलताना सांगितलं. लेह एअरबेसमध्ये भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३०एमकेआय या लढाऊ विमानांह अन्य लढाऊ विमानंही तैनात असतात.

चीन प्रमाणेच पाकिस्तानचीही काही लढाऊ विमानं सीमा रेषेजवळ गस्त घालत असल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तानच्या हवाई दलाची एफ १६, जेएफ १७ आणि मिराज III ही विमानं सीमा रेषेजवळ गस्त घालत होतं. भारतीय हवाई दलही पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button