breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus | नाशिक शहरात कोरोनाचा पहिला बळी
नाशिक | नाशिक शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. हा मृत्यू गरोदर महिलेचा झालेला आहे. २० वर्षीय गरोदर महिलेचा ३ दिवसांपूर्वी उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. आज आलेल्या रिपोर्टमध्ये महिला पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३ मृत्यू झाले आहेत. अशी जिल्हा आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.