breaking-newsमुंबई

भारत-पाक बॉर्डरचा राजा मुंबईहून रवाना

मुंबई – भारत-पाक सीमेवर वसलेल्या पूंछ गावी भारतीय आर्मी छावणीत मराठा रेजिमेंटसोबत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यंदाही मुंबईच्या कुर्ला विभागातील इंडियन नेव्ही बेस येथून श्री गणेशाची मूर्ती रवाना झाली आहे.

पूलस्त नदीच्या तटावर वसलेल्या पूंछ जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करण्याचे यंदाचे 11 वे वर्ष आहे. 2019ला कलम 370 रद्द केल्यानंतर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मोठ्या गणेशमूर्तीऐवजी लहान गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असे सामाजिक उपक्रम करत राहणार आहोत. तसेच यावेळी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना मास्कचे वाटप करण्यात येणार आहे, असे शिव दुर्गा भैरव ट्रस्टच्या अध्यक्षा ईशरदीदी यांनी सांगितले. गणपती बाप्पाच्या आगमनाने कोरोनाला अटकाव होईल आणि मानवजातीला वाचवण्यास बाप्पा मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button