breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनच्या उपग्रह प्रक्षेपण यानाचे अयशस्वी उड्डाण

बीजिंग | चीनच्या कुआइझोउ-११ उपग्रह प्रक्षेपण यानाचे उड्डाण अयशस्वी झाले. जिउक्वान उपग्रहण प्रक्षेपण केंद्र येथून उड्डाण झाले आणि स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी यानाचे उड्डाण अयशस्वी झाल्याचे जाहीर करण्यात आले. झिन्हुआ या चिनी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.

भारताप्रमाणे कमीत कमी खर्चात उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्याचा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने चीनने कुआइझोउ-११ या उपग्रह प्रक्षेपण यानाची निर्मिती केली होती. या यानाचे वजन ७०.८ टन एवढे होते. हे ठोस इंधनावर चालणारे यान होते.

यानाचे उड्डाण ठरल्याप्रमाणे झाले. मात्र पहिला टप्पा संपून दुसरा टप्पा सुरू होण्याच्या सुमारास गंभीर तांत्रिक समस्या निर्माण झाली. उड्डाण अयशस्वी झाल्यानंतर यान परत आणण्याचा प्रयत्न सुरू होता. हा प्रयत्न सुरू असताना पृथ्वीच्या वातावरणात यान अनियंत्रित झाले आणि यानातील दोन उपग्रहांचे नुकसान झाले. चीनच्या कुआइझोउ-११ यानात एक नेव्हिगेशन क्षेत्रासाठी उपयुक्त उपग्रह आणि दुसरा व्हिडीओग्राफीसाठी उपयुक्त उपग्रह होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button