breaking-newsआंतरराष्टीयक्रिडा

भारतीय महिला हाॅकी संघाचा उपांत्यफेरीत प्रवेश

जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल हिने कांस्यपदक जिंकले तर पी.व्ही. सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता हाॅकीमधून चांगली बातमी येत आहे. महिला हाॅकी संघाने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

आज भारतीय महिला हाॅकी संघाने थायलॅंड संघाचा ५-० ने पराभव करत उपांत्यफेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. यामध्ये भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिने ३ गोल करत हॅट्रिक साधली आहे.

Hockey India

@TheHockeyIndia

FT| The Indian Women’s Hockey Team reaches the Semi-Finals of the @asiangames2018 remaining undefeated in the pool-stage fixtures as they beat Thailand by five goals powered by Captain @imranirampal‘s hat-trick.

तर दुसरीकडे भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना अ गटातील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. भारताने गटातील चौथ्या लढतीत दक्षिण कोरियावर 5-3 असा दणदणीत विजय मिळवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button