भारतीय बौध्द महासभेची शहर कार्यकारिणी जाहिर
- अध्यक्षपदी रणदिवे तर महासचिवपदी गायकवाड यांची नेमणूक
पिंपरी- भारतीय बौद्ध महासभा पिंपरी-चिंचवड शहर कार्यकरणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्षपदी अरुणा रणदिवे, महासचिवपदी सुरज गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सोमवारी (दि. 9) पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी नियुक्त करण्यासाठी निगडी वसाहतीमध्ये बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय आल्हाट होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी निवडण्यात आली.
कार्यकारिणी खालीलप्रमाणे
शहर अध्यक्ष अरुणा रणदिवे, महासचिव सुरज गायकवाड, कार्याध्यक्ष गौतम गायकवाड, उपाध्यक्ष रामरतन मोरे, उपाध्यक्ष बुद्धभुषन आहिरे, उपाध्यक्ष सुप्रीया आहिरे, उपाध्यक्ष संजिवनी आजनीकर, सचिव आश्विनी शिनगारे, सचिव ऊमाकांत गायकवाड, सचिव आलका रामटेके, शांताराम नवघरे, संघटक अनूजा वाघमारे, संघटक मधुकर शेलार, संघटक सुरेखा वाघमारे, संघटक एस. व्ही. खैरनार, शितल चंदनशिवे, संस्कार प्रमुख सारंग वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.