breaking-newsपुणे

‘नरेंद्र मोदी सरकार हटाव, देश बचाव’, पुण्यात प्रचारास प्रारंभ

पुणे – ‘मोदी सरकार हटाव, देश बचाव’, अशी घोषणाबाजी करत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे पुण्यात निवडणूक प्रचारास प्रारंभ झाला. उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी आघाडीच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन  आघाडीने प्रचाराचा नारळ वाढविला. यावेळी पुण्यातून काँग्रेसतर्फे इच्छूक अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड, मोहन जोशी, अभय छाजेड, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे, रवींद्र माळवदकर, अंकुश काकडे, प्रदीप देशमुख उपस्थित होते. तसेच शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं (कवाडे व गवई गट), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते.

पालक मंत्री गिरीश बापट यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ भागातून सुरुवात करून आघाडीतर्फे मध्यवर्ती भागात प्रचार यात्रा काढण्यात आली. पक्षाकडु न उमेदवार जाहीर झाला नसला, तरी आता प्रत्येक कार्यकर्ता हाच उमेदवार आहे, असे मानून पुण्याची निवडणूक लढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दरम्यान आज रात्री पक्षाकडून उमेदवार निश्चित होईल, असे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button