breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पिंपरी पोलीस आयुक्तालयाला राज्य शासनाची मंजुरी

पिंपरी – वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी-चिंचवडच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला राज्याच्या मंत्रिमंडळाने आज (मंगळवारी) मंजुरी दिली. मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला आयुक्तालयाचा विषय मार्गी लागला असून लवकरच पिंपरी-चिंचवडमध्ये आयुक्तालय कार्यान्वित होणार आहे. शहरी व ग्रामीण अशा एकूण 15 पोलीस ठाण्यांचे मिळून हे आयुक्तालय होणार असल्याचेी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, गुन्हेगारीकरण यामुळे आघाडी सरकारपासून पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करावे, ही मागणी सुरु होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी तशी घोषणाही केली होती. त्यानंतर अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला मंजुरी मिळाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवडसाठी नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली. नवीन आयुक्तालयात पुणे ग्रामीण मधील 5 तर पुणे शहर मधील 9 पोलीस ठाण्यांचा समावेश होणार आहे. पोलीस आयुक्तालयाची लागणारी जागा तात्पुरती भाड्याने घेण्यात येणार आहे, असे बापट यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button