breaking-newsक्रिडाराष्ट्रिय

भारतीय पुरुष हॉकी संघाचे आजपासून सराव शिबिर

आशियाई क्रीडास्पर्धेसाठी तयारी; राखीव खेळाडूंचाही शिबिरात समावेश 

नवी दिल्ली: आगामी आशियाई क्रीडास्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाच्या सराव शिबिराला बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर उद्या प्रारंभ होत आहे. एकूण 11 दिवस चालणाऱ्या या शिबिरात अंतिम 18 खेळाडूंसह सात राखीव खेळाडूंनाही पाचारण करण्यात आले आहे.

बांगला देश, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या सराव सामन्यांचा समावेश असलेल्या 2 दिवसांच्या खडतर वेळापत्रकानंतर भारतीय हॉकी संघाला अत्यंत आवश्‍यक असलेली एका आठवड्याची विश्रांती देण्यात आली आणि त्यानंतर या शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर 11 ऑगस्ट रोजी संपणार असून त्यात “हाय इन्टेन्सिटी ट्रेनिंग’चा समावेश असेल, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी सांगितले.
आशियाई क्रीडास्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाचा अ गटांत समावेश असून याच गटांत दक्षिण कोरिया, जपान, श्रीलंका, हॉंग कॉंग, चीन व इंडोनेशिया यांचाही समोवश आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यास टोकियो ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरण्याचीही भारताला संधी आहे.

आशियाई क्रीडास्पर्धेसाठी भारताचा पुरुष हॉकी संघ- गोलरक्षक- पीआर श्रीजेश, क्रिशन पाठक व सूरज करकेरा, बचावपटू- हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, वीरेंद्र लाक्रा, सुरेंदर कुमार, रूपिंदरपाल सिंग, अमित रोहिदास, कोठाजित सिंग खडंगबाम व जरमनप्रीत सिंग, मध्यरक्षक- मनप्रीत सिंग, चिंगलेसाना सिंग कांगुजाम, सिमरनजीत सिंग, सरदार सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलकंठ शर्मा व सुमित, आघाडीवीर- एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, अक्षदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंग, सुमित कुमार व शिलानंद लाक्रा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button