breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सुरतमध्ये कारखान्याला भीषण आग; दोघांचा मृत्यू

सुरत – सुरतमधील कडोदरात वरोली येथे आज सकाळी एका पॅकेजिंग फॅक्ट्रिमध्ये आग लागल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 125 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील पलसाना तालुक्यातील वरेली गावात तुलसी पार्क औद्योगिक इस्टेटमध्ये सकाळी साडेचार वाजता भीषण आग लागली. ही कंपनी साडी पॅकिंग करण्यासाठी बॅग आणि मास्क तयार करायची. पहाटे पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळातच जिल्हा आणि सूरत शहरातून दहापेक्षा अधिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचावकार्य सुरू केल्याने अनेकांचे प्राण वाचले. जखमींना स्मीमेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button