breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#CoronaVirus: मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, सामाजिक भान ठेवून शांततेमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन

मुंबई: राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर कोरोना संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. “सण आणि उत्सवांची बदलेली रुपं आपण पाहिलेली आहेत. यातील काळानुरुप बदल आपण स्वीकारले आहेत.

सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे. कोरोनामुळे जिथं संपूर्ण जग हादरुन गेलं आहे तिथं याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करु आणि सामाजिक भान ठेवून शांततेत यंदाचा गणेशोत्सव साजरा करु”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button