breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

CAA: नागपाडा येथील आंदोलकांविरोधात गुन्हा

मुंबई | महाईन्यूज

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) विरोधात नागपाडा येथे २६ जानेवारीपासून धरणे आंदोलन करणाऱ्या महिलांविरोधात शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

आंदोलन ‘मोरलॅण्ड’ रोडवर सुरू आहे. या रस्त्याचे महापालिकेतर्फे काँक्रीटीकरण सुरू होते. मात्र आंदोलकांनी महापालिका कामगारांना हे काम करण्यास प्रतिबंध केला. विनापरवाना रस्त्यावर खुच्र्या, लाकडी मंच उभारून काँक्रीटीकरणाच्या कामासह वाहतुकीला अडथळा निर्माण केला, अशी तक्रार महापालिकेच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांनी शुक्रवारी दिली आहे. त्या तक्रारीवरून आंदोलक आणि आंदोलनाच्या आयोजकांविरोधात भारतीय दंड संहितेतील कलम ३४१, ३४, महापालिका अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवलेला. या गुन्ह्य़ाचा तपास सुरू असून, जबाब नोंदविले जात आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) विरेश प्रभू यांनी दिली.

गुन्हा नोंदवल्यानंतर शनिवारी सकाळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना फौजदारी दंड संहितेतील कलम १४९ नुसार नोटिसा बजावण्याचा प्रयत्न केला. चौकशीसाठी पोलीस ठाणे किंवा तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याची सूचना देणारी ही नोटीस स्वीकारण्यास मात्र आंदोलनकर्त्यां महिलांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी नोंदवहीत आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांचे तपशील नोंदवून घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button