breaking-newsक्रिडा

भारतासमोर मलेशियाचे खडतर आव्हान !

अझलन शाह  हॉकी स्पर्धा

अखेरच्या क्षणी हाराकिरी करण्याचे भारतीय हॉकी संघाची परंपरा अद्याप कायम असून दुसऱ्या सामन्यात २२ सेकंद असताना भारताला कोरियाविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. मात्र अंतिम फेरीत मजल मारण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या भारतीय संघाला मंगळवारी अझलन शाह हॉकी स्पर्धेतील तिसऱ्या साखळी सामन्यात बलाढय़ मलेशियावर विजय मिळवावा लागणार आहे.

जपानवर २-० असा विजय मिळवल्यानंतर मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कोरियाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. एक विजय आणि एक बरोबरी अशा कामगिरीसह भारतीय संघ चार गुणांनिशी गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यजमान मलेशियाने दोन्ही सामन्यांत दमदार विजय मिळवत गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

मलेशियासारख्या बलाढय़ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारताला चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागणार आहे. मलेशियाने दमदार खेळ करत अव्वल प्रतिस्पध्र्याना धूळ चारली आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्याचबरोबर भारताचे माजी प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स हे मलेशियाच्या दिमतीला असल्याने त्यांना भारतीय हॉकीची बलस्थाने आणि कच्चे दुवे चांगलेच माहीत आहेत.

स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला मलेशियाविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे. भारताने या सामन्यात दमदार विजय मिळवल्यास, त्यांचा आत्मविश्वासही उंचावेल आणि पुढील सामन्यांसाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल.

* सामन्याची वेळ : रात्री ८.३५ वा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button