breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

काटेवाडीत तुकोबाच्या पालखीचे पार्थ पवारांनी घेतलं दर्शन

– वारीत वारक-यासोबत पायी चालत घेतला आनंद
बारामती  – ज्ञानबा-तुकारामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी विठ्ठल रक्मिृणी दर्शनास पंढरपुरकडे निघाली आहे. तुकोबारायांची पालखी काटेवाडी (बारामती) दाखल झाल्यानंतर पार्थ अजितदादा पवार हे सहभागी झाले. त्यांनी तुकाेबाच्या पालखीचे दर्शन घेवून वारक-यासोबत पायी चालत वारीचा आनंद घेतला.
आषाढीवारी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी पंढरपुरच्या दिशेने निघालेल्या आहेत.  तुकोबारायांची पालखी काटेवाडीत दाखल झाली. त्या पालखी सोहळ्यात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार प्रथमच वारीत सहभागी झाले. याआधी त्यांनी देहू येथे पालखी पुजनासाठी सहभाग घेतला होता.
पार्थ पवार हे पालखी सोहळ्यातील वारक-यासोबत पायी चालत प्रथमच सहभाग घेतला. त्यांनी काटेवाडी येथून पायी चालत वारीला सुरूवात  केली. बारामती मधील काटेवाडी येथे तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेऊन त्यांनी अवघा महाराष्ट्र आनंदी रहावा, अशी प्रार्थना केली आहे. तसेच दुष्काळी भागात भरपूर पाऊस पडू दे, महाराष्ट्रावरील दुष्काळी संकट दुर होवू दे, बळीराजा सुखी राहू दे, अशी प्रार्थना केली. वारी सोहळ्यातील वारक-यांना पवार कुटुंबियांकडून स्नेहभोजन ठेवण्यात आले होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button