breaking-newsराष्ट्रिय

गौरी लंकेश खून प्रकरणी आणखी दोघांना अटक

बँगलोर: गौरी लंकेश या प्रसिद्ध पत्रकार महिलेच्या खुनासंदर्भात विशेष शोध पथकाने आज आणखीन दोन संशयितांना अटक केली आहे. हुबळी येथील रहिवाशी असणाऱ्या अमित राघवेंद्र बड्डी आणि गणेश मिसकी नामक दोन इसमांना विशेष शोध पथकाने अटक केली असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आज दोन्ही संशयितांना महानगर न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही संशयितांची ६ ऑगस्ट पर्यंत विशेष शोध पथकाच्या कोठडीत रवानगी केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button