breaking-newsताज्या घडामोडीपुणे

यापुढे ग्राहकांना ‘शून्य’ लावणे बंधनकारक

पुणे – यापुढे ग्राहकांना लँडलाइन कनेक्शनवरून मोबाइलधारकाला कॉल करायचा असल्यास मोबाइल क्रमांकापूर्वी ‘शून्य’ लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या एक जानेवारीपासून ही नवी प्रणाली लागू होणार असून, केंद्रीय दूरसंचार विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मे महिन्यात केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने लँडलाइन कनेक्शनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी शून्य डायल केला जावा असा प्रस्ताव ठेवला होता. गेल्या काही वर्षांपासून लँडलाइनप्रमाणेच मोबाइल क्रमांकालाही वेगवेगळे कोड लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशातील वेगवेगळ्या कनेक्शन्सद्वारे केले जाणाऱ्या कॉल्सची माहिती एकत्रित करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली जात असून, यापुढे ‘शून्य’ डायल केल्यानंतर लँडलाइन टू मोबाइल कॉल्सचा स्वतंत्र डेटा कळू शकणार आहे.

या प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी दूरसंचार विभागाने एक जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आता लँडलाइनवरून कॉल केल्यानंतर रिंगऐवजी काही काळ नव्या प्रणालीची माहिती देणारा संदेश ग्राहकांना ऐकवला जावा, असे आदेशही विभागाकडून देण्यात आले आहेत. याद्वारे अधिकाधिक लँडलाइन कनेक्शन्स यूजर्सपर्यंत ही माहिती पोहोचावी, असा दूरसंचार विभागाचा उद्देश आहे.

मोबाइल क्रमांकही ११ आकड्यांचा?

केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने देशातील सर्व मोबाइल क्रमांक अकरा आकड्यांचे असावेत, असा प्रस्ताव दिला होता. त्यावर अद्याप निर्णय झाला नसला, तरी लवकरच मोबाइल क्रमांकांमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button