breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप सरकारचा ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला, राष्ट्रवादी आक्रमक

पिंपरी, (महाईन्यूज) – राज्यातील भाजप सरकारने नुकताच एक अध्यादेश काढून संबंध ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर घाला घातला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी करण्याचा कुठाळपणा भाजप सरकार करत आहे. याच्या निषेधार्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज आंदोलन केले.

आज सायंकाळी पाच वाजता राज्य सरकारने नुकताच एक अध्यादेश काढून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कमी करण्याचे ठरविले आहे. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका संगीता ताम्हाणे, अनुराधा गोफणे, नगरसेवक राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे, कविता खराडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, सचिन औटी, अरुणा, कुंभार, शैलेश बासुतकर, बाळासाहेब ‍पिल्लेवार, आनंदा यादव, उत्तम आल्हाट, मनोज सुतार, सतिष दरेकर, यतिन पारेख, आनंदा कुदळे, ईश्वर कुदळे, नाना धेंडे, सविता धुमाळ, हमीद शेख, बाळासाहेब जगताप, दत्तात्रय जगताप, चंद्रकांत जाधव, सुनिल भुमकर, संतोष दाढगे, चंद्रशेखर भुजबळ, देविदास गोफणे, प्रकाश आल्हाट, वसंत आल्हाट, विशाल जाधव, सतिश चोरमले, पोपट पडवळ, भरत भोसले आजी आंदोलनात सहभागी होते.

ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विजय लोखंडे म्हणाल की, सरकारने हा निणर्य मागे घ्यावा. मागच्या २० ते २५ वर्षापासून आरक्षण प्रक्रीया आहे. तशी राबवावी. हे सरकार नेहमीच कष्टकरी, कामगार, शेतकरी, मागासवर्गीय, ओबीसी यांच्या विरोधात भूमिका घेत असते. राज्यात ओबीसींची संख्या ५२% आहे. भाजप सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर हल्ला केला आहे. त्यासाठी आज सायंकाळी एक अध्यादेश काढला आहे. ओबीसींना येत्या विधानसभा निवडणूकीत विचार करून आपले राजकीय शैक्षणिक, व्यावसायिक आरक्षण टिकवण्यासाठी लढा उभा करावा लागेल. या नाकर्त्या सरकारला धडा शिवण्याशिवाय स्वस्त बसून चालणार नाही. त्यांना घरचा रस्ता दाखवायचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button