breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप महापाैरांच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल

  • ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैंदर्य स्पर्धा आयोजकांच्या आली अंगलट

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कडक निर्बंध लादले. मात्र, हे सर्व नियम पायदळी तुडवत ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैंदर्य स्पर्धा चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृह भरविण्यात आल्या. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करणा-या जवाहर मनोहर ढोरे (मल्हार गार्डन, नवी सांगवी) यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. सार्वजनिक कार्यक्रमांना कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी देण्यात येवू लागली. मात्र, चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैदर्य स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमांसाठी दोनशे जणांची परवानगी दिली होती. तसेच एक आड एक अशी आसन व्यवस्था करावी, मास्क अनिवार्य करण्यात आला. मात्र, कार्यक्रमात सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. प्रा. मोरे सभागृहात संपुर्ण आसन व्यवस्था फुल्लच झाली होती. काहींनी मास्क लावला नसल्याचे आढळून आले.

कोरोना-19 या साथीच्या अनुषंगाने शासनाने प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांसह नियमांचे उल्लंघन केले आहे. सोशल डिस्टन्सींगचे पालन केलेले नाही. अनेक लोकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापाैरांवर कारवाई कधी?

‘मिस पिंपरी चिंचवड’ या साैदर्यवती कार्यक्रमास भाजपच्या महिला नगरसेविका, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. हा उद्घाटन सोहळा आणि रॅम्प वॉक, गौरव समारंभात एकाही नगरसदस्यानी मास्क परिधान केलेला नव्हता. या स्पर्धेचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी फॅशन का जलवा या गाण्यावर महापौरांनी यांनी रॅम्प वॉक केला. यावेळी महापौरांनीही मास्क परिधान केलेला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापाैरांवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button