breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’तील बदलेले संचालक-अधिकारी ‘संकेतस्थळा’वर कायम!

  • संबंधित माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अक्षम्य चुका 
  • ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ अपडेट नसल्याने नागरिकांची निराशा

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या अधिकृत वेब पोर्टल संकेतस्थळावर कार्यरत संचालक मंडळात बदलेले संचालक आणि अधिकारीही दिसून येत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट कनेक्ट होण्याचा उदात्त हेतू ठेवून सुरू करण्यात आलेले हे संकेतस्थळ अपडेट राहत नसल्याचे दिसून येत आहे.

‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ हे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेब पोर्टल आहे. महानगरपालिकेसह स्मार्ट सिटीच्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग वाढवावा यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ ही सुविधा उपलब्ध केलेली आहे.

 

आज तंत्रज्ञानाच्या युगात माहितीची आदान-प्रदानातून नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि या संकेतस्थळावर नागरिकांना महानगरपालिकेशी जोडण्यासाठी उचलेले पाऊल आहे. महानगरपालिकेकडून नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सर्व सेवा, सुविधा, मोबाईल अप्लिकेशन आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या सुविधा सर्व नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यु ट्यूब  अशा समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात आला आहे.

दरम्यान, स्मार्ट सिटीच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या संकेतस्थळावरील माहिती अपडेट होत नसल्याचे दिसत आहे. यामध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा संचालक नाना काटे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, पीएमपीएमएल व्यवस्थापक तथा अध्यक्षा नयना गुंडे, तत्कालिन आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डिकर हे सर्वजण अजून स्मार्ट सिटी संचालक मंडळावर कार्यरत असल्याचे दाखविले आहे. वास्तविक विरोधी पक्षनेते बदलेले असून पोलिस आयुक्त, पीएमपीएमएल व्यवस्थापक, महापालिका आयुक्तांची देखील बदली होवून गेलेले आहेत. याबाबत महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातील संबंधित अधिका-यांच्या अक्षम्य चुकांमुळे हे चुकीचे संचालक संकेतस्थळावर कार्यरत असल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button