breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भाजप नेते राज ठाकरेंच्या भेटीला, आशिष शेलार पुन्हा कृष्णकुंजवर

मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम

मनसेने आपली भूमिका बदलून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राजकीय समीकरणं कमालीची बदलत आहेत. भाजप आणि मनसेमधील जवळीक वाढताना दिसत आहे. भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढत चालल्या आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा राज ठाकरेची त्यांच्या निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर भेट घेतली. शेलार यांची राज ठाकरे यांच्याशी ही दुसरी भेट आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावर वाटचाल सुरु केल्यानं भाजपशी जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांचीही गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेच्या मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चाच्या बरोबर आधी आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांची राज ठाकरेंशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे.

मनसे हिंदुत्वाच्या दिशेने ?

मनसेने आपल्या पहिल्या महाअधिवेशनात झेंडा आणि अजेंडा बदलला आहे. मनसेने भगव्या रंगाचा नवा झेंडा स्वीकारला आहे. शिवाय राज ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका पहिल्यापासूनच असल्याचं म्हटलं होतं. याअगोदर महाराष्ट्रात शिवसेनेकडे कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पाहिले जात होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे निर्माण झालेला स्पेस भरुन काढण्यासाठी मनसे भाजपची साथ देऊन हिंदुत्वाच्या मुद्दावर ही नवी युती होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button