breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

हाय ना खुश असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्या

सातारा | महाईन्यूज

हाय ना खुश असा इन्स्टाग्रामला स्टेट्स ठेवून एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यातील शनिवार पेठेत घडली आहे. कन्व गजानन घाडगे (वय १७, रा. सोन्या मारूती मंदिरजवळ, सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कन्व याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्याचे आई-वडिल मुंबईला नातेवाईकांकडे गेले होते.

घरी कन्व आणि त्याची बहीण दोघेच होते. त्यांचा मामा साताऱ्यातच राहात आहे. या मामाकडे गुरुवारी रात्री बहीण भाऊ जेवणासाठी गेले होते. मात्र, बहीण मामाकडेच मुक्काला थांबली तर कन्व हा एकटाच घरी आला. सकाळी नाष्टा करण्यासाठी येतो, असे त्याने मामाला सांगितले होते. त्यामुळे मामाने त्याच्या मोबाईलवर बराच वेळ फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. मामाने घरी जाऊन पाहिले असता कन्वने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. शाहूपुरी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button