breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  • 1 ते 5 आॅगस्टपर्यंत विविध कार्यक्रम

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन निगडीतील अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात दि. १ ते ५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी ( दि. १) सायंकाळी ५ वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते तसेच सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री अविनाश महातेकर, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व खासदार अमर साबळे यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव असतील, अशी माहिती स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य मनोज तोरडमल व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सतिश भवाळ, सचिव राजू, खजिनदार योगेश लोंढे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, अॅड. गौतम चाबुकस्वार, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, सदस्य मनोज तोरडमल, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले आदी उपस्थित राहणार आहेत.

या प्रबोधनपर्वाच्या प्रारंभी गुरुवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल कांबळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार असून सकाळी १०.१५ वाजता निगडी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तर १०.३० वाजता मनपा मुख्य कार्यालयातील प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन होईल. सकाळी ११.३० वाजता सूर नवा ध्यास नवा फेम अभिषेक कांबळे व चंदन कांबळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, दुपारी २.०० वाजता भव्य बँन्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.०० वाजता प्रबोधनपर्वाचे उदघाटन होणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता साजन बेंद्रे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

शुक्रवार, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता छाया कोकाटे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, सकाळी १०.३० वाजता निता देवकुळे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम तर दुपारी १२ वाजता शाहीर बापू पवार यांचा जगात महान अण्णाभाऊंचे लिखाण हा प्रबोधनपर शाहिरी जलसा कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी ४ वाजता साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील मानवतावाद या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये डॉ. प्रविण डबडगाव, डॉ.रामचंद्र देखणे व अनिरुद्ध देशपांडे यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ७ वाजता राखी चौरे यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

शनिवारी ३ ऑगस्टरोजी सकाळी १० वाजता मोहम्मद रफी शेख प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. सकाळी ११.३० वाजता आसाराम कसबे यांच्या ही दौलत अण्णाभाऊंची या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. दुपारी १.३० वाजता शाहीर रामलिंग जाधव शाहिरी जलसा हा समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर दुपारी ३.०० वाजता आय लव माय इंडिया हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सुनिता कांबळे सादर करणार आहेत. त्यानंतर दुपारी ५ वाजता भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीगुरू लहूजी साळवे यांचे योगदान या विषयावर महाचर्चा होणार असून यामध्ये गिरीश प्रभुणे, विष्णूभाऊ कसबे, मधुकर कांबळे, मनोज तोरडमल सहभागी असणार आहेत. सायंकाळी ७ वाजता अण्णा तुमच्यासाठी हा लोकगीतांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायिका रेश्मा सोनावणे सादर करणार आहेत.

रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी स‍काळी ९ वाजता भव्य पारंपारिक वाद्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णा भाऊंचे लिखाण व अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायक व नायिका या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा तसेच अण्णाभाऊ साठे व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या विषयावर निबंध स्पर्धा यांसह रांगोळी, चित्रकला व नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दुपारी १ वाजता महिला बचतगट मेळावा व मार्गशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी समाज विकास अधिकारी संभाजी एवले व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नितीन घोलप मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४ वाजता गाथा लोकशाहीराची – प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम स्वरांश एंटरटेन्मेंट अॅंड प्रॉंडक्शन सादर करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता सामाजिक न्यायाची भूमिका म्हणजे जातीच्या आरक्षणाचे अ,ब,क,ड वर्गीकरण या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये अमित गोरखे, अविनाश बागवे, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, प्रा. धनंजय भिसे यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ८ वाजता प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काव्य कट्टा हा कविसंमेलनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी १२.३० वाजता कुंदन कांबळे यांचा समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर दुपारी २ वाजता उल्हास तुळवे प्रस्तुत कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी ३.३० वाजता संकल्प गोळे व स्वप्निल पवार यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत महाराष्ट्राचे लोकरंग या प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता प्रबोधन पर्वाचा समारोप व बक्षीस वितरण होईल. सायंकाळी ७ वाजता चित्रसेन भवार यांच्या प्रबोधनात्मक गीतांच्या सांगितिक कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे. तरी या प्रबोधन पर्वातील सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button