breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप ओबीसी मोर्चा तर्फे ‘सन्मान स्री शक्तीचा’ कार्यक्रम

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

पिंपरी | प्रतिनिधी            

ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सन्मान स्री शक्तीचा हा कार्यक्रम व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती प्रधान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, भाजप पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या नेत्या शैला मोळक, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेवक सागर हिंगणे, कोमल काळभोर,  राजश्री जायभाय, ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ऋषीकेश रासकर, योगेश अकुलवार, नेहुल कुदळे, शंकर लोंढे, ललित म्हसेकर, योगेश वाणी, प्रदिप सायकर, अमोल सहाणे, अभिषेक कर्पे, पांडुरंग साने, किरण पाचपांडे, जयश्री देशमाने, सोना गडदे, मनिषा बोराटे, निता गोरे, सुरेखा बनकर, तेजस्विनी कदम, पुजा आल्हाट, तसेच भाजपचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button