breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘रिर्व्हर सायक्लोथॉन’ मध्ये आमदार लांडगेंचा ‘झुंबा डान्स’

‘तुझको मिरची लगी तो मैं क्या करु’ गाण्यावर धरला ठेका

पिंपरी-चिंचवडमधील ‘इव्हेंट’बाज बाज आमदारांचा ‘रोमँटिक मूड’

पिंपरी । प्रतिनिधी

रिर्व्हर सायक्लोथॉन-२०२१ च्या निमित्ताने भोसरी येथील गावजत्रा मैदानावर आयोजित कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांनी रविवारी सकाळी झुंबा डान्स करुन उपस्थित सायकलपटूंनाही ठेका धरायला लावला.

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेशदादा स्पोर्ट्‍स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  नदी संवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी ‘रिर्व्हर सायक्लोथॉन-२०२१’ चे आयोजन करण्यात आले. त्यासाठी भोसरीतील गावजत्रा मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयाजन करण्यात आले होते.

दरम्यान, कार्यकर्ते आणि उपस्थित सायकलपटूंच्या आग्रहास्तव आमदार महेश लांडगे यांनी अभिनेता गोविंदा याच्या चित्रपटातील ‘मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेल पुरी खा रहा था, तुझको मिरची लगी तो मैं क्या करुँ’ या गाण्यावर ठेका धरला.

कोरोना आणि लॉकडाउनच्या नियमांचे पालन करीत रिर्व्हर सायक्लोथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरूवात करण्यात आली. १० किमी आणि २५ किमी अशा दोन टप्प्यांत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button