पिंपरी / चिंचवड

वाकड येथे दिव्यांग मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

– 100 पेक्षा अधिक दिव्यांगांनी घेतला लाभ

पिंपरी | प्रतिनिधी

सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे 9 जानेवारी रोजी लक्ष्मीबाई बारणे उद्यान, वाकड येथे विषेश (दिव्यांग) मुलांकरीता मोफत होमिओपॅथी तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 100 पेक्षा अधिक दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, स्विकृत नगरसदस्य गोपाळ माळेकर, मनोचिकित्सा विभाग जिल्हा रुग्णालय सांगवीचे मिलिंद करंजकर यांच्या हस्ते झाले. यावेळी या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी तर्फे डॉ. रजत मालोकार, डॉ. निवेदिता हांडे, डॉ. प्रियांका धमाळ, डॉ. नीरज कुलकर्णी, डॉ. रोहित देशमुख, डॉ. दिप्ती मालोकार, डॉ. आश्लेषा देशमुख, डॉ. श्रद्धा लांजेवार व सहायक डॉ अनुक्रमे सौम्य चतुर्वेदी, शिवानी पाल, शिवप्रताप सिंग, होनी ओसवाल, सिमरन जाधव, मुग्धा दिवाकर इत्यादी डॉक्टर उपस्थित होते. सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव मनोजकुमार बोरसे, विशाल पवार, विशाल घंदुरे, मच्छिंद्र वीर, नंदकुमार आहेर, समीना काझी, श्रद्धा नगरे, जयश्री डांगे, पालक प्रतिनिधि स्वयंसेवक सतीश ढगे, महेश चौधरी, संतोष कांबळे, रविंद्र तोडकरी, स्वयंसेवक साक्षी भाट, हर्षल सुरूशे, शुभम पिंपळे, वैशाली नारखेडे, तनुजा सुरवसे, निशा जाधव, विकास आदी उपस्थित होते.

दिव्यांग मुलांचा संभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते. अशा पालकांसाठी सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. ऑगस्ट 2021 पासून सुरू केलेल्या या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार सप्तर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात. नोंदणी झाल्याशिवाय शिबिरास प्रवेश दिला जात नसल्याने गर्दी टाळूनही शेकडो लाभार्थी लाभ घेत आहेत.

या शिबिरात विशेष (दिव्यांग) मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषधे देण्यात आली. शिबिरामध्ये शंभर पेक्षा अधीक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. हे शिबिर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले जाते. कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांनी सन 2005 साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आज पर्यंत विजयकर यांच्यामुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत.

या शिबिरात लाभ घेतलेल्या दिव्यांग मुलांच्या पालकांनी अभिप्राय नोंदवले. संजय चोपडे (दिव्यांग लाभार्थी प्रणव चोपडे) म्हणाले, “सप्तर्षी फाउंडेशन यांनी चालवलेला हा उपक्रम फारच कौतुकास्पद आहे. यामुळे माझ्यासारख्या पालकांना आपल्या पाल्यामध्ये काहीतरी चांगले होईल याची आशा निर्माण झाली आहे. येथील डॉक्टर व सहयोगी स्टाफ यांचे सर्वांचे सहकार्य अतिशय चांगले आहे. माझ्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा, सप्तर्षी फाउंडेशन व डॉक्टरांचे आभार.”

रवींद्र तोडकरी (दिव्यांग लाभार्थी रुद्र तोडकरी) म्हणाले, “सप्तर्षी फाउंडेशन सोबत माझा संपर्क मागील सहा वर्षांपासून आहे. फाउंडेशनचे काम खूपच चांगले आहे दिव्यांगासाठी ते एक संजीवनीचे काम करत आहे. प्रत्येक आयोजित कार्यक्रमांमध्ये त्यांचे योगदान नियोजनबद्ध असते. कोणालाही गैरसोय होणार नाही याची ते काळजी घेतात. डॉक्टरांचेही विशेष आभार. त्यांची ट्रीटमेंट सकारात्मक लागू होत आहे. याचा फायदा माझा पाल्य रुद्र रवींद्र तोडकरी यास झालेला आहे. निशुल्क ट्रीटमेंटसाठी सप्तर्षी फाऊंडेशनचे मनःपूर्वक आभार.”

पांडुरंग किसन घुगे (दिव्यांग लाभार्थी प्राजक्ता घुगे) म्हणाले, “सप्तर्षी फाउंडेशनचा हा उपक्रम अतिशय स्तुती करण्यास योग्य आहे, अतिशय मनापासून येथे पालकांची काळजी घेतली जाते. वेळोवेळी घेतलेल्या शिबीर व इतर योजनांसाठी असलेली व्यवस्था अतिशय व्यवस्थित आहे. शिबिरातील औषधांचा माझ्या कन्येला फायदा झाला आहे, हे फाउंडेशन दिव्यांगांसाठी करत असलेले काम उल्लेखनीय आहे. या उपक्रमाला आम्हा पालकांना देखील काहीतरी हातभार लावता आला तर नक्कीच आनंद, आम्ही यासाठी नेहमी तत्पर आहोत.”

स्वर्ग संस्कार अभियाना अंतर्गत 500 पेक्षा अधिक बेवारस मृत व्यक्तींवर अंत्यविधी. शीतऋतु संरक्षण अभियानाअंतर्गत एक हजार पेक्षा अधिक ब्लॅकेट वितरण. दिव्यांगाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र (UDID) साठी एक हजार पेक्षा दिव्यांग व्यक्तींना प्रत्यक्ष निरामय आरोग्य योजनेतून तीन हजार पेक्षा अधिक क्लेम मंजुरी. शेकडो दिव्यांगांना आधार कार्ड व पॅन कार्ड मिळण्यासाठी प्रत्यक्ष मदत. विविध आरोग्य शिबिर अंतर्गत हजारपेक्षा दिव्यांगाच्या कुटुंबांना लाभ. कोरोना काळात शेकडो गरजूंना मोफत अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंचे वितरण. दुष्काळ मुक्त मराठवाडा अभियाना अंतर्गत मराठवाड्यात जलसंधारणाचे मोठे कार्य. आदी कामे संस्थेने केली आहेत.

श्री. बोरसे म्हणाले संस्थेचे विविध संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली मुळे, सचिव श्रीकांत चव्हाण, सदस्य वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, नगरसेवक नाना काटे, बापू काटे, बाबा त्रिभुवन, मयूर कलाटे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, अण्णा नखाते, उन्नती फाउंडेशनचे संजय भिसे, स्विकृत नगरसदस्य संदीप नखाते, निलेश ज्ञानेश्वर नखाते, काटे फुड्सचे मालक अविनाश काटे, भवानी मेडिकल रहाटणी, रामभाऊ बुलेट चहाचे मालक श्री रामभाऊ, महालक्ष्मी हार्डवेयरचे श्री. परमार, ओपेराई लांच होमचे श्री. पिराप्पा, संतोष माने, रमेश नलावडे, शासकीय अधिकारी रविकिरण घोडके, संतोष शिंदे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button