breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप आमदार राम कदमांना मनसेकडून जोडो मारो आंदोलन

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  दहीहंडी उत्सवात मुंबईतील घाटकोपरचे आमदार व भाजप प्रवक्ते राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये उमटले. मनसेचे पूर्वाश्रमीचे आमदार असलेल्या कदम यांच्या प्रतिमेला मनसेच जाहीरपणे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या घटनेचा निषेध करीत कदम यांच्याकडून तातडीने माफीची मागणी केली आहे.

कदम दरवर्षी दहीहंडी उत्सव दणक्यात करतात. सेलिब्रिटींची हजेरी त्याला असते. यावेळी,तर मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. ते येण्यापूर्वी कदम यांनी भाषण केले. मतदारांची कुठली कुठली कामे करू असे सांगताना त्यांनी मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. एखाद्या तरुणाला नकार दिलेल्या तरुणीला पळवून आणून मी त्याला मदत करीन, असे वक्तव्य कदम यांनी केले होते.

ते आक्षेपार्ह असल्याने शहर महिला आघाडीने पत्रक काढून त्याचा निषेध केला. तसेच कदम यांच्या माफीची मागणीही केली. तसेच पिंपरीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आणि निषेधार्ह असल्याने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारल्याचे मनसेचे शहरप्रमुख आणि गटनेते सचिन चिखले यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button